महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी संदेश पलसे तर सचिव पदी प्रतिक कळसे
उपाध्यक्षपदी नितीन बुंजकर , खजीनदारपदी संतोषकाका गुळमिरे तर कार्याध्यक्षपदी वैभव गवळी

सांगोला/प्रतिनिधी::
शहरातील वीरशैव लिंगायत समाजाची महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२५-२६ च्या नियोजनासंदर्भात रविवार दि.३१ रोजी सायंकाळी ८ वाजता बैठक पार पडली.या बैठकीत नूतन अध्यक्षपदी संदेश पलसे,सचिव प्रतीक कळसे तर खजिनदार पदी संतोष गुळमीरे तर कार्याध्यक्ष पदी वैभव गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सांगोला शहरामध्ये वीरशैव लिंगायत समाज व म. बसवेश्वर युवक संघटनेच्या वतीने
महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी,महीला यांच्या साठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर महा राजांच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास हार अर्पण करीत सकाळी प्रभात काढून महात्मा बसवेश्वर उत्सव मूर्तीचे पूजन करून पुढील चार दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तर शेवटी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या उत्सव मूर्तीची शहरातून भव्य मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होते.
रविवारी झालेल्या बैठकीत मिरवणूक प्रमुख म्हणून नयन लोखंडे, संजोग घोंगडे, प्रतिम तोडकरी,सुमित कोठावळे, अविनाश ढोले,यांची देखील निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.यावेळी मागील वर्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कालावधीतील जमा खर्च सदर केला.याच बैठकी मध्ये महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांची तर सांगोला नगरपरिषद कृती आराखडा सदस्य पदी आनंद घोंगडे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला तो सर्व वीरशैव बांधवांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केला.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी सचिवांनी अभिनंदन करून आभार उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.