नागेश ढोणे यांची सांगोला माझा च्या उपसंपादक पदी निवड!
मेडशिंगी गावचे शेतकरी सुपुत्र मा. श्री. नागेश ढोणे यांची सांगोला माझा च्या उपसंपादक पदी निवड!

सांगोला माझा,सांगोला प्रतिनिधी,
कोरोना काळापासून सांगोल्यातील कानाकोपऱ्यातील घडामोडी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तमाम सांगोला वासियांच्या घरपर्यंत अचूक माहिती पोहचवणाऱ्या सांगोला माझा या प्रतिष्ठित न्यूज़ चैनल च्या उपसंपादक पदी मेदशिंगी गावचे सुपुत्र मा. श्री नागनाथ राजेंद्र ढोणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दैनिक सांगोला नगरी व माणदेश नगरी चे संपादक माननीय सतीश रावसाहेब सांवत व दैनिक सूपर फ़ास्ट चे संपादक मा. श्री. सचिन भुसे या मान्यवरांच्या उपस्थितीमधे नागनाथ ढोणे यांना उपसंपादक हे पद पुष्पगुच्छ देऊन बहाल करण्यात आले, यावेळी नागनाथ ढोणे यांनी संपादक प्रा. कैलास गोरे , व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच माझ्यावर दिलेल्या पदाची जबाबदारी मी निष्ठेने व तळमळीने पार पाडीन अशी ग्वाही दिली.