जवळा येथे 27 व्या रोजा निमित्त साळुंखे-पाटील कुटुंबीयांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

सांगोला माझा,
जवळा प्रतिनिधी,
सालाबाद प्रमाणे याही वर्षी रमजान महिन्यांमध्ये 27 व्या इफ्तार पार्टीचे आयोजन साळुंखे-पाटील कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.यामध्ये सामाजिक सलोखा व प्रेम आबादीत राहावे व हिंदू मुस्लिम एकता टिकून राहावी यासाठी कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्यापासून चालत आलेली विशिष्ट परंपरा तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शारदा देवी साळुंखे-पाटील यांनी सामाजिक सलोखा जपत तो वारसा पुढे नेला आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विधान परिषदेचे माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील यांनी तो वारसा आज देखील तेवत ठेवलेला आहे.27 वा रोजा म्हटले की सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांचा आज रोजा असतो त्यामध्ये साळुंखे-पाटील घराण्याची परंपरा म्हणून आज दीपक आबा साळुंखे पाटील यांचा देखील रोजा आहे .तसेच गावात देखील बऱ्याच हिंदू मुस्लिम बांधवांचा रोजा आहे.गेली 20 ते 25 वर्ष सालाबाद प्रमाणे रमजान महिन्याच्या 27व्या रोजाचे औचित्य साधून साळुंखे-पाटील कुटुंबीयांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते म्हणूनच आज शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी ठीक साडेसहाच्या दरम्यान जवळा येथील मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले असल्याचे जवळा येथील मुस्लिम समाजाचे नेते व उपसरपंच श्री नवाज खलिफा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.आज सायंकाळी जवळा मुस्लिम सुन्नत मस्जिद येथे सर्व मुस्लिम समाजातील लहान थोर व्यक्तींनी हजर राहावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने 27 व्या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचे भाग्य साळुंखे-पाटील कुटुंबीयांना लाभत असल्याने जिल्ह्याचे नेते तसेच विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मुस्लिम समाज जमात जवळा यांचे आभार व्यक्त केले आहेत व सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी आपली जवळे गावाची असलेले विशिष्ट परंपरा अबाधित ठेवण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीमध्ये सामील व्हावे असे आवाहन केले आहे.