दिपकआबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग सुरूच भोपसेवाडीत शेकापला खिंडार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
दिपकआबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग सुरूच भोपसेवाडीत शेकापला खिंडार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सांगोला : तालुका प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच लागली आहे. तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे. भोपसेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला.
दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेकांचे पक्षप्रवेश धडाक्यात सुरू आहेत. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे पक्ष संघटन अधिक मजबूत स्थितीत उभे राहिले आहे. सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथील सुनील बाळू गावडे, संतोष बाळू गावडे, सागर बाळू गावडे, अनिल शामराव गावडे, कुमार शामराव गावडे यांच्यासह शेकापच्या यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हातात घेतली आहे. यावेळी दीपकआबा साळुंखे पाटील यांचे खंदे समर्थक कुमार नायकुडे, सुरेश गवंड, नंदू वगरे, सुनील गावडे, अनिल गावडे, विशाल आगलावे, शिवाजी कोळेकर, नितीन बुरंगे आदी उपस्थित होते.