सोलापूर
स्व.एम.ए. नरवाडे साहेब यांच्या पत्नी म.खैरूनिस्सा महंमदहसन इनामदार यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन
मुलगी सौ.शबनुर इनामदार व मानसपुत्र कैलास गोरे यांना मातृशोक

सांगोला माझा-जवळा प्रतिनिधी,
स्व.एम.ए. नरवाडे साहेब यांच्या पत्नी म.खैरूनिस्सा महंमदहसन इनामदार यांचे वयाच्या 83 व्या वर्षी राहत्या घरी अल्प आजाराने दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. यशवंत सहकारी बँकेचे संचालक एम.ए. नरवाडे यांच्या पत्नी म.खैरूनिस्सा महंमदहसन इनामदार यांचे राहत्या घरी जवळा ता.सांगोला येथे 17 एप्रिल सायंकाळी 5 वाजता अल्प आजाराने निधन झाले असून तिसऱ्या दिवसाचा विधी (जियारत) शनिवार दि.19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता मुस्लिम कबरस्थान जवळा येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात त्यांची 1 मुलगी 1 जावई 1 नात व 2 नातू तसेच 1 मानसपुत्र असा त्यांचा परिवार आहे.त्यांच्या अचानक जाण्याने इनामदार कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने आसपास हळहळ व्यक्त केली जात आहे व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना केली जात आहे.