सोलापूर

सौं. हर्षदा दयानंद गुळमिरे यांचे दिल्लीत काव्यवाचन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सांगोला प्रतिनिधी,

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२५ चे आयोजन दि. २१,२२,२३फेब्रु.२०२५


देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आले होते.
या संमेलनाची सुरुवात साहित्य ग्रंथदिंडी(पंढरपूर ते दिल्ली),चित्ररथ ,कलापथक वाजत गाजत.ढोल ताश्यांच्या गजरात झाली.भारतातील कानाकोपऱ्यातून आलले हजारो मराठी साहित्य रसिक प्रेमी उपस्थित राहून दिल्लीत ७० वर्षांचा इतिहास जागा केला.


या संमेलन प्रसंगी उपस्थित
पंतप्रधान मा .नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले, स्वागताध्यक्ष मा.शरद पवार साहेब होते,प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस होते, संजय नहार,उषा तांबे, रविंद्र शोभणे,संमेलन अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर उपस्थित होत्या .
या अखिल भारतीय मराठी संमेलनात कवयित्री सौ.हर्षदा दयानंद गुळमिरे सांगोला जि.सोलापूर येथील रहिवासी असून पंढरपूर ते दिल्ली साहित्य यात्री दिंडीत तुळस घेऊन साहित्यिक वारकऱ्यासमवेत सहभाग घेतला .
राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम दिल्ली
येथील श्रीमंत सयाजीराजे महाराज गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचार पीठावर पांडुरंग ही कविता सादरीकरण केली.उपस्थितांची मने जिंकली.
छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ कवी कट्यावर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे संस्थापक अभिनेते डॉ.शरद गोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार ,युवराज नळे डॉ.पोपेरे, संजय आवटे, रामदास मोरे( तुकाराम महाराज वंशज), मा. फुलचंद नागटिळक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी
जितेंद्र कांबळे सर (आळेफाटा), डॉ.विजय पोपेरे (अकोले),नितीन पाटील सोलापूर, हेमंत चिकणे, सुवर्णा तेली ,सुषमा आलेकर, यशवंत घोडे जुन्नर,वीणा व्होरा, अलका नाईक (मुंबई),लक्ष्मण हेंबाडे ,आदेश फुलगे, संदीप तोडकर, तुकाराम जेगोले,माणिकराव गोडसे तुकाराम मोरे, हेमंत बोरसे ,तोरस्कर,सुवर्णा वाघमारे यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव अशा अनेक भागांतून आलेल्या निमंत्रित कवींच्या कविता सादर झाल्या .
दि २१ते २३ फेब्रुवारी ग्रंथदिंडी,मुलाख, परिसंवाद,लोकसाहित्य, कविसंमेलन,कवी कट्टा, एकपात्री नाटृय सादरीकरण झालेतृ . खासदार सुप्रिया ताई सुळे, मा.सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजितपवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत ,मा.विजय दर्डा लोकमत वृत्तपत्र
साहित्य संमेलनासाठी भारतातील असंख्य मराठी साहित्य प्रेमी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button