शैक्षणिक

विरशैव लिंगायत समाजातर्फे संदेश पलसे यांचा सत्कार संपन्न

केंद्रीय मानव अधिकार सांगोला तालुकाध्यक्षपदी संदेश पलसे यांची निवड

सांगोला/प्रतिनिधी:: सांगोला शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच विविध सामाजिक संस्थेचे सदस्य, सर्पमित्र संदेश पलसे यांची नुकतीच केंद्रीय मानव अधिकार संघटना दिल्लीच्या सांगोला शाखा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर सत्कार समारंभास महाराष्ट्र विरशैव सभेचे माजी प्रांतिक अध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर समाजाच्या वतीने स्वर्गीय गोविंद जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सत्कारमुर्ती संदेश पलसे यांचे बद्दल बोलताना प्रा.पी.सी.झपके पुढे म्हणाले संदेश पलसे हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो केंद्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे मिळालेल्या पदाचा वापर समाज उपयोगी कार्यासाठी करावा तसेच तो या पदाला योग्य न्याय देईल असे मत व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र विरशैव सभेचे माजी अध्यक्ष मनोज उकळे सरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.सदर सत्कार समारंभास लिंगायत समाजातील ज्येष्ठ सदस्य व महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार महाराष्ट्र विरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महेश गुळमिरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia