जवळा येथे यशवंत चे शिल्पकार म.मोहहम्मद अब्बास नरवाडे यांचे 37 वे पुण्यस्मरण संपन्न
जवळा येथे यशवंत चे शिल्पकार म.मोहहम्मद अब्बास नरवाडे यांचे 37 वे पुण्यस्मरण संपन्न

सांगोला माझा-,प्रतिनिधी,
सहकार क्षेत्र व राजकारणात सांगली भागात अग्रेसर असणारे एम. ए. नरवाडे यांची 37 वी पुण्यतिथी आज दि.03 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांची कन्या सौ.शबनूर राजू इनामदार यांचे घरी (जवळा) येथे संपन्न झाली,सालाबादप्रमाणे याही वर्षी नरवाडे साहेब यांच्या कन्या सौ शबनूर इनामदार व कुटुंबीयांनी नरवाडे साहेब यांचे विचारांचा वारसा जपत त्यांची पुण्यतिथी पार पाडली. स्वर्गीय नरवाडे साहेब यांनी गोरगरीब जनता व तळागाळातील सर्व समाज घटकांसाठी मोलाचे योगदान दिले आहे.यशवंत पतसंस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला पाच रुपये ते दहा रुपये गोळा करून पतसंस्था सुरू केली व या पतसंस्थेचे रूपांतर यशवंत सहकारी बँक लिमिटेड सांगली यामध्ये झाले .व तदनंतर त्यांनी न थांबता गोरगरीब जनतेसाठी सहकार्याची नेहमी भूमिका ठेवली. दिवंगत मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. जुन्या काळातील पोस्ट ग्रॅज्युएट असलेले नरवाडे साहेब हे शिक्षणाने समृद्ध असल्यामुळे व मराठी भाषेत त्यांनी पदवी मिळवल्यामुळे त्यांचे भाषेवर खूप मोठे प्रभुत्व होते आणि त्याच गोष्टीचे महत्त्व ओळखून वसंत दादा पाटील यांनी स्वर्गीय नरवाडे साहेब यांना अगदी जवळ केले व वेळप्रसंगी त्यांच्याकडून स्टेजवर बोलली जात असणारी मोठी भाषणे लिहून घेण्यास सुरुवात केली हा त्यांचा राजकीय प्रवास . तसेच गोरगरीब जनतेला हात गाडी लावण्यास तसेच उद्योग व्यवसाय उभे करण्यास त्या काळात त्यांनी मदत केल्याने आजही त्यांचा पुतळा मिरज येथील मुख्य मार्केटमध्ये आपणास पहावयास मिळेल. त्यांचा विवाह जवळे येथील इनामदार कुटुंबीयातील खैरूनिस्सा बाबालाल इनामदार यांच्याशी 1963 साली झाला .1972 साली त्यांनी जवळा येथे मोठा चिरेबंदी वाडा बांधला व ते जवळा व सांगली येथे ये जा करत असत. जवळा येथे वावरत असताना त्यांचे संबंध श्री बाळासाहेब गावडे ,श्री प्रकाश गोरे ,श्री चडचणकर गुरुजी यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आले व घुले घराण्यातील श्री बाळासाहेब घुले व कै. सज्जन राव घुले यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते दृढ झाले. नरवाडे साहेब यांचे सासरे स्वर्गीय बाबालाल इनामदार यांच्यावर त्यांची खूप मर्जी होती दोघे मिळून आधुनिक तंत्रज्ञान वापरून जवळा येथील त्यांची शेती करत असत व जवळा येथे सुद्धा समाजकार्य करत असत समाज कार्य करताना जवळा येथे सुद्धा थोडाफार राजकारणाचा अंश आल्याने त्यांचे स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील कुटुंबीयांशी देखील निकटचे संबंध राहिलेले होते. जवळा येथे मज्जिदचे बांधकाम करण्यास त्यांचा मोठा हातभार लाभला असे देखील बोलले जाते .त्याकाळी स्वर्गीय युसुफ इनामदार व एम ए नरवाडे या दोघांनी मिळून अरब देशातून निधी उपलब्ध करून जवळा येथील मशीद मोठ्या दिमाखात उभी केली. असा हा त्यांचा आदर्शवत कारभार सांगली व जवळा तसेच मिरज येथे चालायचा परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं जवळा येथे कामानिमित्त आल्यानंतर सामाजिक कार्य व कामाचा तणाव यामुळे अचानक त्यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या व जवळा येथून त्यांना उपचारासाठी सांगलीच्या दिशेने घेऊन जाण्यात आले व उपचारादरम्यानच 3 नोव्हेंबर 1987 साली एम ए नरवाडे साहेब नावाचं वादळ शांत झालं. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कन्या शबनूर ह्या एकट्या पडल्या व वडिलांचे छत्र हरपल्याने व घरामध्ये करता पुरुष कोणी नसल्याने त्यांचा विवाह अगदी कमी वयातच जत चे राजू राजू जैनुद्दीन डफेदार यांच्याशी करण्यात आला तदनंतर अगदी कमी वयातच त्यांचा संसार सुरू झाला व असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. नरवाडे साहेब यांच्या कन्या यांचे विचार तंतोतंत नरवाडे साहेब यांना जुळणारे असल्याने मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा त्यांनी निर्धार केला व वेळप्रसंगी स्वतःच्या शेत जमिनी विकून मुलांना चांगले व मानाचे शिक्षण दिले त्या शिक्षणामध्ये एका मुलीला व मुलाला इंजिनियर बनवले तसेच लहान मुलाला के बी एन साईराम डिजिटल या नावाचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.पुण्यस्मरण दिनानिमित्त शिक्षणाने समृद्ध व व्यवसायाने ही समृद्ध मी माझ्या मुलांना घडवले असून खऱ्या अर्थाने हीच माझ्या आदर्श पित्याला आदरांजली आहे असे उदगार त्यांच्या कन्या सौ शबनूर इनामदार यांनी काढले.