कोळेगाव येथे एका व्यक्तीला लोखंडी पाईप व लाकडाने जबरदस्त मारहाण
कोळेगाव येथे एका व्यक्तीला लोखंडी पाईप व लाकडाने जबरदस्त मारहाण

सांगोला माझा – महूद प्रतिनिधी,
सांगोला तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत कोळेगाव या गावात अब्दुल अकबर मुलाणी या व्यक्तीला मारहाण केली गेली आहे मारहाण करणारा व्यक्ती प्रमोद सावंत राहणार कोळेगाव तालुका माळशिरस हा असून अब्दुल अकबर मुलाणी राहणार कोळेगाव यांच्या घरी येऊन सावंत या व्यक्तीने अब्दुल मुलाणी यांचे आईस अपशब्द वापरण्यास सुरुवात केली व शिव्या दिल्या. बाहेर शिव्या कोण देत आहे हे पाहण्यासाठी अब्दुल मुलाणी आले असता त्यांना प्रमोद सावंत हा व्यक्ती दारूच्या नशेत त्यांच्या आईशी हुज्जत घालत असल्याचा निदर्शनास आले. अब्दुल मुलाणी यांनी कशीबशी समजूत काढून त्यांना त्या ठिकाणहून जाण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अब्दुल मुलाणी नेहमीप्रमाणे गाडीवर गावात गेले असता प्रमोद सावंत यांनी त्यांना गावामध्ये अडवून दमदाटी करून लाकडाने मारहाण केली. व आता तुला मी गावात राहू देत नसतो अशा प्रकारे मोठमोठ्याने ओरडू लागला व हातातील लाकडाने मारू लागला व लगेचच प्रमोद सावंत यांचे भाऊ प्रवीण सावंत हे मागून लोखंडे पाइपने मारू लागले दोघांनी मिळून अब्दुल मुलाणी यांना गाडीवरून खाली पाडून मारले. यावरून असे लक्षात येते की पोलिसांची भीती कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रमोद सावंत यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होत असून सुद्धा व प्रमोद सावंत हे तडीपार असताना गावात यायला त्यांना मनाई असताना ते गावात आलेच कसे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यासह आचारसंहिता चालू असताना तडीपार असलेला व्यक्ती गावात आलाच कसा यामुळे प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारतीय दंड संहिता कलम बी एन एन एस 174 च्या अंतर्गत कलम 115 चा दोन कलम 352 कलम 351 चा दोन कलम 351 चा तीन कलम 3 चा पाच या कलमांतर्गत वेळापूर पोलीस ठाणे येथे एनसी दाखल केले असल्याची माहिती मुलानी यांच्या नातेवाईकांनी दिली आहे त्याचबरोबर वेळापूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रेगुडे याचा तपास करीत आहे