सोलापूर
प्रसिद्ध मटन व्यापारी व मतीन,मोहसीन व सुलतान उर्फ टिपू नाडेवाले यांना पितृषोक
जवळा येथील सुप्रसिद्ध मटन व चिकन व्यापारी मो.पै.रऊफ इलाही नाडेवाले यांचे अल्प अशा आजाराने निधन

- सांगोला माझा प्रतिनिधी,
जवळा येथील सुप्रसिद्ध मटन व चिकन व्यापारी मो.पै.रऊफ इलाही नाडेवाले यांचे अल्प अशा आजाराने निधन, जवळा व मेडशिंगी येथे अत्यंत प्रेमाने व जिव्हाळाचे संबंध ठेऊन सर्व शेतकरी वर्गात मटण व्यवसायात प्रतिष्ठा व व आपली छाप निर्माण करनारे रौउफ़ नाडेवाले यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाल्याने तमाम नाडेवाले परिवार व मुस्लिम सुन्नत जमात जवळा यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळल्या असल्याची माहिती मुस्लिम सुन्नत जमात जवळा चे अध्यक्ष जमीर भाई बागवान व उपाध्यक्ष लतीफ नदाफ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये गरिबीच्या झळा सोसत असताना तीन मुलं व दोन मुलींना जन्म देऊन संसाराचा गाडा हाकत असताना रऊप भाई नाडेवाले यांनी मटन व्यवसायामध्ये आदर्श निर्माण केला त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मतीन व सुलतान उर्फ टिपू नाडीवाले यांनी हा व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली व आज तमाम शहरांमध्ये तीन भाई मटन शॉप हा व्यवसाय मोठ्या उत्साहाने चालू आहे त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव मोहसीन नाडेवाले हे मुंबई येथे शिक्षक म्हणून आपले काम बजावत आहेत रऊफ नाडेवाले यांना तीन मुले दोन मुली असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुस्लिम कब्रस्तान जवळा येथे होणार असून तमाम मुस्लिम व हिंदू बांधवांना विनंती करण्यात येते की आपण उपस्थित रहावे अशी माहिती त्यांचे जेष्ठ चिरंजीव मतीन रऊफ नाडेवाले यांनी दिली आहे.